prabodhini news logo
Home ठळक बातम्या मेगा बीच क्लीन ड्राईव्ह – इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप दिनानिमित्त

मेगा बीच क्लीन ड्राईव्ह – इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप दिनानिमित्त

0
124

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

मिरा-भायंदर महानगरपालिकेच्या “स्वच्छता ही सेवा” पंधरवडा (17 सप्टेंबर – 2 ऑक्टोबर 2025) अंतर्गत आयोजित मेगा बीच क्लीन ड्राईव्ह ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

500+ महानगरपालिका कर्मचारी, 4000+ विद्यार्थी, स्थानिक नागरिक, विविध NGO, सामाजिक संस्था व बचत गट सहभागी झाले. या मोहिमेत उत्तन समुद्रकिनाऱ्यावरील 7410 किलो कचरा गोळा करून पुढील प्रक्रियेसाठी पाठवला गेला.

उपस्थित मान्यवरांमध्ये मा. आयुक्त श्री. राधाबिनोद शर्मा, केंद्रीय व राज्य शासन प्रतिनिधी, महानगरपालिका अधिकारी आणि फॉर फ्युचर इंडिया संस्थेचे स्वयंसेवक सहभागी होते.

महानगरपालिका सर्व सहभागींचे आभार व्यक्त करते आणि नागरिकांना आवाहन करते:

प्लास्टिक व इतर कचरा योग्यरित्या विल्हेवाट लावा

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखा

समुद्रातील प्रदूषण टाळा

भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, सुंदर व हरित मिरा-भायंदर घडविण्यास सहकार्य करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here