prabodhini news logo
Home ठळक बातम्या राष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

राष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

0
173

लाखनी च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

लाखनी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – लाखनी: अबॅकस एक प्राचीन गणनायंत्र आहे, जे गणितातील सर्व प्रकारच्या जसे बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार यासाठी वापरले जाते, यामुळे गणना सुलभ होते, मानसिक गणना,एकाग्रता, आणि दृष्टीकोन वाढून ,स्मरणशक्ती वाढून गणितात रुची निर्माण होऊन मनोरंजन बनते, याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे लाखनी येथील नामदेव घोडमारे सर संचालित द अबकस वर्ल्ड क्लास च्या विद्यार्थी यांनी राष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेच्या राष्ट्रीय पातळीवर विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
यात लेवल एक मध्ये सेकंड रँक चेतना प्रमोद वैद्य , आणि प्राप्ती नितेश वंजारी यांनी पटकावले ,
तर नैऋत्य सुनील भुरे , रिदिमा आवेदन चौधरी ,अथर्व रमेश धरमसारे , जोहार नामदेव घोडमारे यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले ,
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ .बी . एस . चौधरी सर (समर्थ महाविद्यालय लाखनी )यांच्या हस्ते करण्यात आले, बोलताना सर म्हणाले की ,आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबतच अबॅकस ला ही आत्मसात करणे आवश्यक आहे , तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ . नयनाताई चौधरी (सामाजिक कार्यकर्त्या )शून्यातून सुरुवात केल्यानेच यशाच्या शिखरावर पोहचता येते असे ते म्हणाले, अभय डी रंगारी ( मुक्त पत्रकार)कॅलक्युलेटर आणि कॉम्प्युटर सारखी आधुनिक गणना यंत्रे खूप जलद आणि अचूक आहेत ,परंतु अबॅकस विद्यार्थ्यांना मानसिक गणना शिकवितो आणि त्याच्या बुद्धीला धार देतो ,इलेक्ट्रॉनिक यंत्रावर आधारीत गणनामुळे मानसिक क्षमता कमी होऊ शकते , पण अबकस वापरून ती क्षमता वृद्धिंगत केली जाऊ शकते , असे ते म्हणाले, भैय्याजी बावनकुळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, दृढ संकल्प, जिद्द चिकाटी ,आणि आत्मविश्वास व सातत्याने प्रयत्न केले तर, कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते क्लास चे संचालक नामदेव घोडमारे यांनी
राष्ट्रीय पातळीवर बेस्ट टीचर अवार्ड यात दुसऱ्या क्रमांक पटकावला याबद्दल त्यांना ही गौरविण्यात आले,
कार्यक्रमाचे सूत्र संचालन चेतना प्रमोद वैद्य,तर आभार प्रदर्शन अथर्व धरमसारे यांनी केले, कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक वर्ग आणि परिसरातील नागरिक आवर्जून उपस्थित होते, सदर कार्यक्रम परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here