
सर्वत्र नवरात्रिची धामधूम आहे. गरबा, देवी जागरण, उपवास,पुजा अर्चना,देवीलाल सजविणे इत्यादीमध्ये सगळे मग्न आहेत. चला, या सर्व षोडशोपचारचा आध्यात्मिक अर्थ आहे आहे तरी काय? जाणून घेऊया!
देवींच्या मूर्ती पाहिल्यानंतर लक्षात येते की त्या आपल्यासारख्याच आहेत म्हणजे हात, पाय, कान, नाक, मुख शरीराने मनुष्य आक्रुतीच आहेत. पण त्या पुजनीय आहेत. पुजा कशाची होते? श्रेष्ठ कर्मांमुळे, पवित्रता धारण केल्यामुळे! या नऊ देवींनी कोणते श्रेष्ठ कर्म केले बर आणि श्रेष्ठ कर्माचे ज्ञान देणारा ज्ञान दाता कोण तो काळ कोणता आणि कोण आहे जो कर्माची गुह्य गति समजुन सांगेल ज्यामुळे आपले श्रेष्ठ भाग्य बनते किंवा आत्मा पूजा करण्या योग्य बनतो.
जिवनाचे उदिष्ट आहे,हे नर तु एसा कर्म कर की तु नर से नारायण बन। हे नारी द्रोपदी तु एसा कर्म कर की तु नारी से लक्ष्मी बन।
एकसद्गुरु व्यतिरिक्त सत्य मार्ग दाखवणारा कोणी नाही. श्रीमद भगवदगीतेच्या अध्याय ४ मधील श्लोक ७ मध्ये “यदा यदा ही धर्मस्य ग्लार्निर भवती भारत…” असे म्हटले आहे. धर्माची ग्लानी होते तेव्हा मी येईन, या वचनानुसार, ईश्वर जेव्हा या सृष्टीवर साकार रूपाने येतात, तेव्हा ते स्वतः बाप, शिक्षक, सद्गुरु म्हणून साकार भूमिका बजावतात. आपण दोनही हाथ जोडुन ईश्वराला प्रार्थना करतो, “त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुच सखा त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव ‘” आध्यात्मिक विद्यालयात अध्यात्मिक शिक्षण देतात आणि कर्माची गुह्य गती समजावून सांगतात. ते कलह आणि क्लेशाने भरलेल्या जुन्या जगाचा विनाश करतात आणि सत्ययुगातील नवीन जगाची स्थापना करतात. त्यांच्या या कार्यात जो जितका सहकारी सहयोगी बनतो, तो तितकाच पुजनीय बनतो.श्रीमद भगवदगीतेच्या अध्याय ३ मधील श्लोक ९ मध्ये (कर्मयोग) श्लोक
“यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः। तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ।”
या श्लोकात भगवान अर्जुन ला समजावून सांगतात की यज्ञाव्यतिरिक्त इतर कर्म बंधनात हां संसार कर्मबंधनात टाकनारा आहे. म्हणून, हे कौन्तेय, आसक्तीपासून मुक्त व्हा आणि यज्ञाच्या उद्देशाने कर्म करा. ईश्वराने सांगितले आहे.
भगवद गीता, अध्याय 3, श्लोक 21
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।
भावार्थ – या श्लोकात भगवान सांगत आहे की, श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो, इतर लोकही त्याच्यानुसार वागतात. लोक फक्त तेच अनुसरतात जे तो सिद्ध करतो.
आपण कोणतीही कृती करतो, इतर आपल्याला पाहतील आणि तेच करतील.
सुभाषित असेही म्हणतात की, महाजनेनामध्ये असे म्हटले आहे की ‘गतः स पंथः’.
रात्री चा अर्थ:
रात्री म्हणजे अंधकार. रात्रि म्हणजे ठोकर खाने दर दर भटकने भटकंती होय . कसला अंधकार ? कसला काऴोख? हां अज्ञानाचा अंधकार, अज्ञानाचा काऴोख होय .पुढील
भागात- नऊ रात्रीचा अर्थ:- क्रमशःभाग दोन
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
आध्यात्मिक विश्व विद्यालय, दिल्ली
फोन नं (0)9891370007,(0)9311161007.















