
आदिवासी नृत्य, परिसंवाद, लावण्या, नाटयगीते, झाडी कीर्तनाची मेजवानी
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ब्रह्मपुरी झाडीपट्टी नाटय विकास मंडळ, देसाईगंज (वडसा) जि. गडचिरोली द्वारा आयोजित ५ वे झाडीपट्टी नाटयसंमेलनाचे भव्य आयोजन दिनांक ४ व ५ ऑक्टोंबर २०२५ ला नाटयसंस्थेची बाजारपेठ असलेल्या देसाईगंज (वडसा)च्या आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात केले गेले आहे.
या ५ वे झाडीपट्टी नाटयसंमेलनाचे संमेनाध्यक्ष प्रसिद्ध विनोदी नाटयकलावंत के.आत्माराम यांची निवड करण्यात आली असून उद् घाटन सहपालकमंत्री नाम.अँड आशिष जयस्वाल करणार आहेत.या समारंभाचे अध्यक्ष माजी मंत्री,आमदार विजय वडेट्टीवार राहणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार रामदास मसराम असतील.
विशेष अतिथीमध्ये खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार नानाभाऊ पटोले, आमदार धर्मराव बाबा आत्राम, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार सुधाकर अडबले, आमदार अभिजित वंजारी, झाडीबोली महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, नटवर्य डॉ. शेखर डोंगरे, विशेष आकर्षण हास्यसम्राट भारत गणेशपुरे, पद्मश्री डॉ परशुराम खुणे यांच्या उपस्थितीत ४ ऑक्टोंबर २०२५ ला सकाळी ११.३० वा. संमेलनाचे उद् घाटन पार पडेल.
यानंतर आदिवासी नृत्य, परिसंवाद, संमेलनाध्यक्षाची मुलाखत, लावण्या,कलावंतांचा सत्कार, समारोपीय नाटक अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना दोन दिवस मिळणार आहे.
या दोन दिवस चालणाऱ्या झाडीपट्टी नाटयसंमेलनाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नाटय विकास मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर, उपाध्यक्ष अनिल उटृलवार, सचिव हिरालाल सहारे, सहसचिव किरपाल सयाम, कोषाध्यक्ष युवराज प्रधान व इतर सदस्यांनी केले आहे.















