
वैद्यकीय शिक्षण , हाऊसपोस्ट पूर्ण केल्यानंतर, आनंद एका सिनियर मित्राच्या डिस्पेंसरीत लोकम करू लागला.
तो मित्र परदेशात काही महिन्यांकरीता गेला होता.
त्या मित्राच्या पेशंट पैकी काहीजण , आनंदला बघून ” आंम्ही आमचे डाॅक्टर आल्यावर येऊ ” म्हणत आणि निघून जात.
आनंद हिरमुसला होत असे.
पण त्याच्या आई _ वडीलांनी त्याला सांगितलं ” रोज ठराविक वेळेवर डिस्पेंसरीत जात जा. पेशंटना तू रोज येतोस , हे कळलं कि ते तुझ्याकडेही ट्रिटमेंट घ्यायला नक्कीच येतील.”
आनंदला हे पटलं.
तो रोज ठराविक वेळेवर जाऊ लागला.
हळूहळू पेशंट येऊ लागले.
त्यांना ट्रिटमेंट ने बरं वाटू लागलं आणि त्यांचा डाॅक्टर आनंदवरील विश्वास वाढू लागला.
काही महिन्यांनंतर आनंदचा तो मित्र आला.
तो आनंदवर खूप खुश झाला.
वेळेवर कामं करत रहावीत.मेहनतीचं
फळ हळूहळू मिळू लागतं.
एम.बी.बी.एस.झाल्यावर ,लिनाला पुढे शिकून हाॅस्पीटल मध्ये नोकरी करायची होती.
पण तिच्या आई वडीलांनी चांगलं स्थळ आलं एका डाॅक्टरचं ,म्हणून तिचं लग्न केलं.
लिनाला एम.डी. व्हायचं होतं.ही गोष्ट तिच्या मनातच राहिली.
सासरी ,तिला आता मुल व्हावं असं सासूबाई म्हणू लागल्या ,तशीतशी ती आतून आक्रंद करू लागली.
” मला एम.डी. करायचं आहे…. “
तिने हे नवर्याला सांगितलं.
तो म्हणाला,” आधी शिकायला हवं तू. मूल नंतर होऊ देऊ.”
तिने एम.डी साठी प्रवेश घेतला .एम.डी.झाल्यावर
तीन वर्षांनी तिला मूल झालं.
प्रवीण , शाळेत शिकवलेला प्रत्येक धडा घरी आल्यावर स्वतः वाचतो.
गणितं स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतो. नसेल काही कळलं तर लगेच दुसर्या दिवशी शाळेत शिक्षकांना विचारून शिकून घेतो.त्यामुळे त्याला पुढे पुढे जाता येतं.
वेळेवर कामं पूर्ण करणे,आजचं काम उद्या वर न टाकणे ,याचे चांगले फळ असेच तर मिळते.
वेळेचे महत्त्व जाणून ,ती वाया न घालवता तिचा सदुपयोग करावा,हेच खरं.
गेली कि परत नाही येत वेळ.
डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे.
ठाणे.















