prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – नारीशक्ती

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – नारीशक्ती

0
88

किती रूपे तुझी सांगू
जीवनात साथी आहे
किती सोज्वळ शितल
माया अनुभूती पाहे…

कधी अहिल्या माई
कधी माता भिमाई
शिक्षणाची तू ग साऊ
त्यागी तू माता रमाई…

जगण्याला बळ तुझे
सुंदर आयुष्य माझे
तूच माझी ग जननी
आणि आयुष्याची साथी…

या रे जगण्याला साथ
कधी माझी कन्यारत्न
नारीशक्ती ऋणी तुझा
प्रेयसी आधार माझा…

जगणे तुझे सुंदर
मायेचा हा पदर
हे माझी आदर्श माय
मी वंदितो तुझे पाय…

 गायकवाड मनोज रामचंद्र
 शहापूर जिल्हा ठाणे ©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here