prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – विजया दशमी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – विजया दशमी

0
67

वाईट शक्तींना दूर करुनी
विजय झाला सत्याचा
पराक्रमी आंबा मातेने
पाडाव केला असुरांचा (१)

विजयाचे प्रतीक म्हणुनी
करती विजया दशमी साजरी
शास्त्रे, अस्त्रे,अवजारे, पूजुनी
सोने लुटूनी करताना गोजिरी.(२)

नकारात्मकता दूर करू
अविचार बाजूला सारू
सकारात्मक ऊर्जा कृतीने
मन गाभारा तेजोमय करू. (३)

स्वार्थाला दूर करुनी
माणुसकीची कास धरू
समाज सेवेचे व्रत घेवूनी
विजया दशमी साजारी करू.(४)

अंजली गरगटे
पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here