
अश्विन शुक्ल दशमीस
2 ऑक्टोबर 2025 स.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक
शुभद मुहूर्त ‘दसरा ‘हा खास.
शमीपत्र, वृक्ष ही पूजन
अपराजिताचेही अर्चन.
दूर सारून चुकीचे मागील
सिमोल्लंघन करावे आवर्जून.
जया विजयांपैकी एक
अपराजिता हीच देवी दुर्गा.
धारण करून रौद्र रुप
विजयी ती राक्षसांस मारून.
वेळ आपला लावावा सत्कारणी
मेहनतीचे फळ मिळण्यास.
विद्या _ कला प्राप्त करूनी
समस्या दूर सारून,यश प्राप्तीस.
नांगर,फाळ,औजार, पूजा शेतात
नवकार्याची करावी जोमात सुरूवात.
वही, पाटीवर सरस्वती चिन्ह काढूनी
अक्षरारंभ करूनी,करावी विजयादशमी नव संकल्पात.
डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे
ठाणे.















