
बौद्ध शिकवणीतून राष्ट्र उभारणी करणारा सम्राट सम्राट अशोकाविषयी असं म्हटले जाते की त्यांच्या साम्राज्याचा विस्तार एवढा प्रचंड होता की जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड एकाच साम्राज्याखाली आला होता . भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासावर अमीट छाप उमटवणाऱ्या सम्राट अशोकाचा कार्यकाळ चाळीस वर्षाचा होता. इतकेच नाही तर बौद्ध धर्माला वैश्विक धर्माच्या पातळीवर पोहचवण्यात देखील अशोक यांना यश आलं . प्रत्यक्षात त्या काळात बौद्ध धर्माचे फार कमी अनुयायी होते. तामिळनाडू आणि केरळ ही दक्षिणेची दोन राज्य सोडली तर संपूर्ण भारत पुर्व पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा किमान पुर्वेकडील भाग सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली होता.
लोक भाषेतून संदेश देणारा सम्राट अशोक यांनी त्याचे संदेश प्राकृत भाषेतून लिहिले त्याकाळी संपूर्ण मौर्य साम्राज्यात प्राकृत बोलली जायची . सुनील खिलनानी लिहीतात की “सर्व मौर्य साम्राटामधे अशोकांची जीवनशैली सर्वात वेगळी होती “सातव्या शिलालेखात अशोकानी म्हटले होते की जिथे जिथे शिळा असतील किवा दगडी स्तंभ असतील तिथ त्यांचे शब्द कोरण्यात यावे जेणेकरून ते दिर्घकाळ टिकतील ” जोपर्यंत माझे वंशज राज करतील किंवा जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात तळपत राहतील तोपर्यंत माझे हे शब्द लोकापर्यंत पोहचले पाहिजे त्यांना वाचता आले पाहिजेत. बहुतांश शिलालेख प्राकृत भाषेत असून ते ब्राह्मी लिपीत कोरण्यात आले आहे . तर काही शिलालेख ग्रिक आणि अरमाईकी लिपीमध्ये देखील कोरण्यात आले आहे.
सहिष्णुता आणि अहिंसेवर भर सम्राट अशोकांनी बुध्दाची शिकवण अमलात आणली . आध्यात्मिक ,पावित्र्य आणि चालीरितीवर धम्म आधा- रलेला नव्हता. तर जगण्यातील आचार व्यवहारावर धम्म आधारलेला होता. या व्यवहारामध्ये सहिसष्णुतेवर भर देण्यात आला होता. तर हिंसेला थारा नव्हता. रोमिला थापर लिहीतात की , “अशोकाने ज्या मुल्यांचा सार्वधिक महत्व दिले त्यातील पहिलं म्हणजे विविध मताचं मतातंराचं सह अस्तित्व.”
“अशोक यांना वाटत होते की सर्वानी मिळून मिसळून राहीले पाहीजे. एकमेकांच्या मताचा विचाराचा आदर केला पाहिजे. सहजीवनाच्या भावनेने राहण्यास शिकले पाहिजे.” इतरांच्या संप्रदायाचा आदर केला पाहिजे. कारण इतरांच्या संप्रदायाचा आदर करूनच तुम्हाला स्वतः च्या संप्रदायाचा आदर करता येईल.” धम्माचं हे मुख्य मुल्य किंवा सुत्र आहे. बहुधा त्याकाळी खुपच शत्रुत्वाची भावना असावी . धर्मानुसार जनतेचे कल्याण त्यांचे आरोग्य आणि सुखाबद्दल विचार करणं आणि त्यासाठी काम करणं हे राजाचं किंवा शासणाचं कर्तव्य आहे. अशोकांचा सर्वात प्रभावी विचार आणि संदेश बाराव्या शिलालेखात कोरण्यात आला आहे. यात धार्मिक सहिसष्णुतेवर भर दिला आहे. याला अशोक बोलण्यातील संयम म्हणजे वाक संयम म्हणत. शिलालेखात लिहिले आहे की “आपल्या धर्मात असणाऱ्या प्रचंड भक्तीमुळे त्यांची स्तुती किंवा गुणगान करतो आणि त्याच वेळी इतर धर्माची निंदा नालस्ती करतो . ते आपल्या धर्माचे नुकसान करत असते” सर्वानीच इतरांचे विचार लक्षात घेतले पाहिजे.
त्याचा आदर केला पाहिजे. रोमीला थापर लिहितात, “हान आणि रोमन राजवंशाच्या तुलनेत मौर्य वंशाची राजवट कमी काळ होती. मौर्य साम्राज्याची सुरुवात चंद्रगुप्त मौर्याच्या विजयानंतर झाली होती. त्यानंतर चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्य शिखरावर पोहोचले होते . त्याला प्रचंड वैभव प्राप्त झाले होते . मात्र सम्राट अशोकांच्या मुत्यु नंतर मौर्य साम्राज्याची घसरण वेगाने झाली अशोकाचा मुलगा आणि नातू आपल्या आजोबा आणि पणजोबा इतक्या क्षमतेचे आणि त्यांच्या इतके कर्तबगार नव्हते . त्यांची राजवट देखील कमी काळ होती. “त्यामुळे नंतरच्या काळात अशोकाच्या अनेक वारसा मधे मौर्य साम्राज्य विसरले गेलं त्यांची वाताहात झाली आणि साम्राज्याचे अनेक तुकडे झाले. भारतियासाठी सम्राट अशोक प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे अशोकाचे चार सिंह फक्त भारताच्या पोष्ट ऑफिस तिकीटावरच नाही तर भारताचे राष्ट्रीय चिन्ह ही आहे . संपूर्ण भारतीय जिवनाचे ते एक अभिन्न प्रतिक बनलं आहे. हे चिन्ह शांतता पुर्ण सह अस्तित्वाचं , सहिष्णुतेचही प्रतिक आहे सम्राट अशोकाचा सार्वजनिक जीवनातही संयम ठेवण्याचा आणि स्वतावर नियत्रंण ठेवण्याचा संदेश आजच्या भारतियासाठी इशारा आणि प्रेरणा सुध्दा आहे…..
सम्राट अशोक व विजयादशमी ( धम्म चक्र प्रवर्तन दिन ) याचे महत्त्व सम्राट अशोकाच्या कलिंग युध्दातील विजयानंतरच्या दिवसाशी जोडलेले आहे. या दिवशी अशोकाने युध्द पातळीवर शस्त्र त्याग केला आणि बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. ज्याला ” धम्मक्रांती ” असे म्हटले जाते. हा ऐतिहासिक दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ही ओळखल्या जातो.
विजयादशमी दिनानिमित्त सम्राट अशोक यांना शतशःप्रणाम
नंदा भगत / कारंजा लाड
जि. वाशिम















