prabodhini news logo
Home चंद्रपूर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुट्टी जाहीर करा

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुट्टी जाहीर करा

0
169

बौद्ध आंबेडकरी जनतेची मागणी

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूर येथे दलित,शोषित अस्पृश्य समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
या ऐतिहासिक धम्मदीक्षा समारोहाचे अनन्या साधारण महत्व आहे. तीन लाख लोकांनी रक्ताचा एक थेंब न पडता धम्म क्रांती केली या पवित्र दीक्षाभूमीला जागतिक पातळीवर महत्त्व आहे.
मागील अनेक वर्षापासून धम्मदीक्षा समारोह निमित्ताने 16 ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात येत होती परंतु या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली नाही या बद्दल माहिती होताच जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत कार्य करणारे युवकांनी पुढाकार घेऊन आज जिल्हाधिकारी यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाची सुट्टी जाहीर करावी ही मागणी केली जेणेकरून जिल्ह्यातील शासकीय निमशाकीय बौद्ध आंबेडकरी जनतेला परिवारासह या मंगलदिनी पवित्र दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी सोयीचे होईल शिष्टमंडळात ॲड.राजस खोबरागडे, सचिन पाटील, ॲड प्रियंका चव्हाण,कपिल गणवीर, प्रणित तोडे, हर्षल खोब्रागडे , एकता भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here