
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – दिनांक पाच व सहा ऑक्टोबर 2025 कांचन रिसॉर्ट अमरावती येथे अतिशय उत्साहात सोहळा पार पडला आदिवासी साहित्याच्या अभ्यासक सुप्रसिद्ध साहित्यिक उषा किरण आत्राम संमेलनाच्या अध्यक्ष होत्या कार्यक्रमाची नियोजन आयोजन अतिशय सुंदर अशे विजयाताई मारोतकर यांनी केले. ढोल लेझीम च्या जल्लोषात ग्रंथ दिंडी सुरुवात झाली.
विदर्भ शलाका विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला. साहित्य संमेलन 10 सत्रात संपन्न झालं .कवी संमेलन, परिसंवाद, कथाकथन,गझल मुशायरा, अभिरुप न्यायालय ,सहभागी लेखिकांचे कथासंग्रह काव्यसंग्रह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.पाच वैदर्भीय स्त्री रत्नांचा सन्मान ही करण्यात आला. साहित्यिका मंगला नागरे यांनी प्रस्ताव वाचन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्षा विजया मारोतकर यांचे नियोजन अतिशय सुरेख असं होतं कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली..















