
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – होमगार्ड संघटना हे निष्काम भावनेने समाजाची सेवा करीत असतात. आपातकालीन परिस्थितीमध्ये आग विझवणे, आपदाग्रस्तांची सुटका करणे, कायदा व सुव्यवस्था चे पालन करणे इत्यादी महत्त्वपूर्ण जबाबदारीचे कामे होमगार्ड संघटनेचे सदस्य करीत असतात. सोबतच सामाजिक बांधिलकी व पर्यावरणाचा ढासळत चाललेला असमतोल लक्षात घेता मा जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात सिद्धिविनायक कॉलनी येथे सिद्धिविनायक गणेश मंदिर च्या परिसरात दिनांक 05/10/2025 रोजी वृक्षारोपण केले.
यावेळी प्रदीप बलवीर पलटण नायक, हेमलता कांबळे समादेशक अधिकारी वर्धा, बाबा तुरक वपनl, चंद्रशेखर शेलकर प. ना. महिला अधिकारी रंजना करपाते, सारिका कामतकर पलटण नायक, व मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला होमगार्ड हजर होते.
यावेळी वार्डातील रहिवासी उपअधीक्षक भूमी अभिलेख विनोद माळोदे, डॉक्टर रवींद्र बमनोटे, प्राध्यापक चव्हाण, शेळके, राठोड व इतर नागरिक मोठ्या संख्येने हजर राहून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास सहकार्य केले.












