prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा

0
78

नभी चंद्राला पाहून
मनच मोहित झाले
हट्टच माझाच होता
आज चंद्रच आणले।।१।।

रोज पहात राहिले
साक्षात त्याच चंद्राला
आज माझ्याच घरात
तोच चंद्र अवतरला।।२।।

आज आहे कोजागिरी
दिते लक्ष्मी वरदान
नकळत हा मिळाला
चंद्रच मजला छान।।३।।

येता चंद्र माझ्या घरी
खायला दिले श्रीखंड
गोड गोजीऱ्या चंद्रात
बुडून गेले अखंड।।४।।

त्याची माझी जोडी आता
खूप सुंदर जमली
चंद्रा सोबत खेळून
नाहीच कधी दमली।।५।।

चंद्र माझ्या आवडीचा
रोज भेटायला येतो
कोजागिरी पौर्णिमेला
दूध नि साखर खातो।।६।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here