prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा

0
99

आज टिपूर चांदणं
आकाशामध्ये आलं
कोजागिरी पौर्णिमेची लगबग
आनंदी वातावरण झालं…

जमत होतो सारे जण
आमच्या बालपणीच्या आठवणी
शेतात टिपूर चांदणं
मग गातो होतो सुंदर गाणी….

वेध लागले सुगीचे
धरणीमाय नेसली सोनेरी लेणं
दूध आटवू कोजागिरीला
म्हणू नका कोणाचं कोण…

शुद्ध जगण्याचा संदेश
रंग लेवून एकतेचा
कोजागिरीचा तो सण
भाव जपतो आपुलकीचा…

 गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here