prabodhini news logo
Home कोरची संविधान जनजागृती प्रश्न मंजुषा स्पर्धचे आयोजन

संविधान जनजागृती प्रश्न मंजुषा स्पर्धचे आयोजन

0
190

शासकीय आश्रम शाळा कोरची येथील उपक्रम

नम्रता सरदार (रामटेके) मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – कोरची – शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथील बहुउद्देशिय सभागृहात दिनांक ११ आक्टोंबर रोज शनिवारला इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरीता भारतीय संविधानावर आधारित संविधान प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाच्या पुढाकाराने राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाणीव आणि समज वाढावी यासाठी संविधान जनजागृती प्रश्न मंजुषा स्पर्धा राबविण्यात येत आहे. सदर स्पर्धेत आश्रम शाळेतील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर दुसरा क्रमांक इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला. विजेता विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने सन्मानीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक भैयालाल कुरसंगे,हरीश कामडी, धनश्री परतेती, मनोज गजभिये, राहुल अंधारे, अभिमन्यू वाटगुरे, प्रमोद शंभरकर, गुरुराज मेंढे, कुणाल गोवर्धन, मनोज आचार्य,सुषमा आंबोणे, नैना येंगलवार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख अरुण कायंदे यांनी केले. तर आभार मनोज आचार्य यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here