
सोळा कलांचा चंद्रमा
दिसे आज नभातूनी…
प्रतिबिंब पाहते मी
दाटलेल्या मेघातूनी….
शोधते रूप तुझे मी
दिसशी मला कुठे तू…
पाहता मी अंबरी
चंद्रशेखर सामोरी तू…
भेट आपली रोज घडते
मी निशा अन् शशी तू…
बघ शुभ्र चंद्रिका मी
अन् निशाकर कधी तू…
मिलन व्हावे वाटे कितीदा
परी नच जुळती तिथी त्या…
युगे न युगे लोटली तरी
चक्र फिरते सृष्टीवरी या…
आशालता भोसले
इंदापूर पुणे जिल्हा















