prabodhini news logo
Home कारंजा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष लेख – बदलते नाते

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष लेख – बदलते नाते

0
84

 

प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या भावनेने
एकमेकाशी जोडला गेलेला आहे .
यात दोन व्यक्तीना जोडणारा प्रेम, जिव्हाळा,
आपुलकी, सहानुभूती एकमेकांविषयी असलेली
कृतज्ञता आदर भावनेच्या बंधनाला आपण “नाते “
असे म्हणतो. नाते जोडून ठेवण्याची ताकत एका शब्दात
आहे ते म्हणजे प्रेम. आधीच्या काळी ज्याप्रमाणे नाती
टिकून होती त्याप्रमाणे आजकाल दिसत नाही.
आपण जन्माला येताक्षणी काही नात्यात बांधल्या जातो.
तर काही नाते आयुष्यात जगताना आपण जोडत जातो .
म्हणजेच काही रक्ताची तर काही प्रेमाच्या आधारावर
जोडलेली असली तरी या नात्याला उतरती कळा लागली
आहे. जो तो स्वतः रक्ताच्या व जन्माच्या नात्यात ही
फक्त स्वार्थात व पैशात मोजण्याची शर्यत सुरू आहे .
जन्माच्या नात्याला उपकाराची भावना निर्माण झाली .
म्हणजे मी मायबापाचे करतो, केले म्हणजे त्यांच्या
संप्पतीवर माझाच अधिकार आहे. किंवा लहान भाऊ
किंवा मोठा भाऊ नोकरी निमित्त बाहेर गावी, शहरात
असल्यास, घरी असणारे मोठे, किंवा लहान असलेले
भाऊ कपट कारस्थाने करून त्याची जमीन हडपतात
किंवा आई वडीलांच्या संप्पतीतून बेदखल केल्या जाते.
समाजातून माणुसकी इमानदारी नावाची संप्पती लोप
पावत आहे. व बेईमानी वर्चस्व गाजवून शिरजोर
बनत आहे .

आधीच्या काळी एवढा प्रवास नव्हता, सुविधा नव्हत्या
मोबाईल, विज्ञान तंत्रज्ञानाचा शोध नव्हता त्यामुळे नाते
जुळून होती जसजश्या सुविधा उपलब्ध होत गेल्या
तसतसे नाते दुरावत गेले, सुविधा घराघरात येऊन
येऊन पोहचल्या व घरातला माणूस घरात असून काल्पनिक
जगात किंवा विज्ञानाच्या युगात स्वतः त रमू लागला
नात्याविषयी असलेली आपुलकी त्यांना दूर लोटू लागली
शिक्षणाची चढाओढ निर्माण झाली घरातील मुलंमुली
शिक्षणासाठी नोकरीनिमित्त शहरात जाऊ लागली
परंतु घरापासून दुरावली . खेड्यातील घरच्या शेतात
काम करणाऱ्याना वाटते हे शहरात नोकरी करू लागले
सुख उपभोगू लागले आम्ही शेतात मरमर कष्ट करतो
त्यामुळे मनात वितुष्ट पणा निर्माण होऊ लागला. आम्ही
शेती सांभाळली म्हणजे आम्हीच शेतीचे मालक झालो.
शेतीच्या उद्द्शाने गावी असलेले नातेवाईक रक्ताच्या नात्याचा भावकिचा गैरफायदा घेऊन वागू लागले .
सहानुभूती व आपुलकीची भावना फक्त वरवर दाखविण्यापुरती राहीली . रक्ताची नाती आई वडील
भावंड , कौटुंबिक नाती सासु,सुन ,दिर भावजय या
सारख्या नात्यामधे कालांतराने होणारे बदल व त्याचे
स्वरूप बदलत आहे . नाती मैत्रीची, कौटुंबिक,
शेजारधर्माची किंवा केवळ माणुसकी धर्माची ही असू
शकते
नात्यामधील बदल :-
लग्नानंतर पती पत्नीच्या नात्यात अनेक बद्दल होत
आहे. आधुनिक जीवनशैली मुळे कौटूंबिक व्यवस्था
सामाजिक नात्यावर फरक पडत आहे. नात्यामध्ये
फक्त अपेक्षांचे ओझे निर्माण होत आहे . हल्ली “हम दो हमारे दो ” अशी अवस्था झाली आहे.
आताच्या प्रथेनुसार आत्या, मामा ,मावशी, काका
यांनाच थोडे फार महत्व प्राप्त झाले आहे .कुठे कुठे तर रक्ताच्या नात्यातही धोकाधाडी, कपट, लालचीपणाने स्वार्थी भावना निर्माण झाली आहे. फक्त नात्याला दुषने लावून नाते तोडण्याचे आटोकाट प्रयत्न चालले आहे.
नाते हे रक्ताचे असो की मैत्री प्रेमाचे गरज संपली की
नातं सबंध बदलतात. अशी मतलबी आजची दुनिया आहे अशा बदलत्या नात्याने समोरच्या पिढीला
सांगण्यासाठी नाते राहील की नाही असा प्रश्न
निर्माण होतो.

नंदा भगत /कारंजा लाड
वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here