prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा

0
120

लुकलुक हे चांदणे
आकाशास सजविले.
पृथ्वीवरती प्रकाश,
अनुरागाने पसरे.
देऊन अर्ध्य चंद्रास
किरणांचा घ्या आस्वाद.
पृथ्वीच्या आज जवळ
सकारात्मक, शितल.
शरद पौर्णिमेस हा
रात्रीस कोजागिरीचा
दूध,तांदुळ केशर,
साखरही आटवून
पित्त, रक्त दोषहर
पिऊन रात्री जागून
लक्ष्मी देवीस स्मरून
व्हावी पौर्णिमा सादर.

डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे.
ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here