prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा

0
84

अश्विन शुद्ध पौर्णिमेला
चांदणे पडले शरदाचे
पुर्ण चंद्रमा आकाशी येई
सुंदर चांदण नक्षत्र मनाचे

देखणा तो चंद्रमा आणि
दुधाळ मधाळ गगन
सोळा कलायुक चांदोबा
पवित्र होते वातावरण

कोजागिरीच्या मुहूर्तावर
आशीर्वाद देण्या भक्तांना
लक्ष्मी माता आली जन्मा
योजिले त्यासाठी समुद्र मंथना

विष्णू लक्ष्मी सुधांशूंचे पूजन
कोजागिरीच्या पवित्र दिवशी
सुधाकराच्या शीतल प्रकाशात
शरदाचं टिपूर चांदणे खेळे रात्रीशी

गोड,केशरी अन सुगंधित दुध
हलवत आटवावे मंद आचेवर
काजू बदाम पिस्ते चारोळी
वेलची जायफळाची पखरण त्यावर

असे दूध ठेवले चंद्र प्रकाशात
शशी किरणे पडताच त्यावर
प्रतिकार शक्ती वाढे शरीरात
उत्साह आणि आनंदाचा वावर

को s जागरती असे विचारीत
येतसे आल्हाददायक पौर्णिमेची रात
शशांक किरणाची बरसात
सगळीकडे दिसे पृथ्वीतलात

(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here