
चंदनाच्या परिमलाने
सुगांधीत झाली धरती
कोजागिरी पौर्णिमेला
सागराला आली भरती
चंद्र आहे सोबतीला
तारकांच्या घेरामध्ये
उधळीत प्रीत आली
रोहिणी तोऱ्या मध्ये
आज सख्या आठवते
भेट तुझी माझी पहीली
चांदण्यांची फुले झाली
प्रेम वचने दिली घेतली
याच चंद्राच्या प्रकाशात
प्रीत आपुली फुलली
पाहिलेली स्वप्न सारी
जीवनी साकार झाली
आजचा ही चंद्र लाभो
सर्व प्रेमवेड्या जीवांना
केशरी दुधाची गोडी
लाभू दे तूम्हा सर्वांना
सौ.वंदना पाटील















