prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – बदलते नाते

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – बदलते नाते

0
115

लग्न नव्हे भातुकलीचा खेळ,
दोन मनांचा असे सुंदर मेळ
लाड़ली कन्या होता उपवर,
पित्याच्या जीव होई खालीवर
स्थळ येता एखादे चांगले,
करु हात पोरीचे पिवळे
विचारात रात्रि जागरण असत,
लेकीस हिरव्या मंडपी पहातसे
निरोप येता कुण्या स्थळाचा,
समजा आईचा दिन लगबगीचा
तैयार करुनी लेकीस सुंदर,
चहापोहे घेवूनी पाठवी समोर
काही दिन वाट बघणे निरोपाची,
हृदयी चालें तालमेल अस्वस्थेची
एकदा होकाराचा निरोप येतो,
आनंदाने उवाच येई घरा त्या
लग्नाची लगीनघाई सुरुहोई,
हळूच तो मंगल दारी येई
शहनाई चौघडा वाजे दारी,
अक्षरा पड़े लेकीच्या डोक्यावरी
माता पित्याच्या हृदयी उठे कळ,
नयनातील अश्रुंना नसे खळ
“जाणून गुज एकमेकांच्या मनीचे करा संसार समजूनी सार सुखाचे”,
हाच आशिर्वाद तिज देवून
करी सासरी कन्येची पाठवण.

सौ अनुराधा लक्ष्मण मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here