
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने BSUP योजनेअंतर्गत अर्धवट राहिलेल्या आणि सध्या महानगरपालिका निधीतून पूर्णत्वास नेण्यात येत असलेल्या इमारतीतील ५ पात्र आदिवासी लाभार्थ्यांना नव्या सदनिकांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या.
हा विशेष चावी वाटप सोहळा महानगरपालिका मुख्यालयात पार पडला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक, माजी आमदार नरेंद्र मेहता, आदिवासी क्षेत्र पुनरावलोकन समितीचे अध्यक्ष मा. विवेक पंडित, तसेच महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “ही केवळ घरांची वाटप प्रक्रिया नसून, नव्या जीवनाची, स्थैर्याची आणि सन्मानाची सुरुवात आहे.”
तसेच ज्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत अशा लाभार्थ्यांना लवकरच घरांच्या चाव्या देण्यात येतील, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
ही वाटप प्रक्रिया आदिवासी बांधवांच्या पुनर्वसनाचा आणि सामाजिक सक्षमीकरणाचा नवा टप्पा मानली जात आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आदिवासी नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सन्माननीय होणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व लाभार्थ्यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाचे आणि आयुक्त राधाबिनोद शर्मा यांचे मनःपूर्वक आभार मानले.















