
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – कुही: नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील म्हसली येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पंचशील सबौद्ध उत्सव स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास शेकडो महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
या कार्यक्रमास जिल्हा महीला व बालविकास प्रकल्प अधिकारी रणजित कुऱ्हे आणि भंडारा जिल्यातील प्रसिद्ध सर्जन डॉ. मधुकर रंगारी यांची विशेष उपस्थिती होती.

नाशिक चवरे आणि देवानंद उके यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. धम्मचक्र गतिमान करण्यासाठी व ज्ञानाच्या प्रसार प्रचारासाठी विहार हे पूर्वीपासूनच ज्ञानकेंद्र राहिले आहेत.असे प्रतिपादन धम्मदिप उके यांनी केले. डॉ.बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे आपले जीवन व्यतीत करण्याचा सल्ला डॉक्टर मधुकरजी रंगारी यांनी उपस्थितांना दिला.यावेळी विपश्यनेची आवश्यकता व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यावर रणजित कुऱ्हे साहेब यांनी प्रकाश टाकला.स्मारक समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मेश्राम प्रास्ताविक केले.स्मारक समितीचे सचिव संघरत्न उके यांनी आभार व्यक्त केले. हर्षवर्धन डोंगरे सर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.श्री.धम्मदिप उके सर यांनी तथागत सम्यक संबुद्ध आणि संघरत्न उके यांनी विश्वरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दान केले. डॉक्टर मधुकरजी रंगारी आणि दादाजी मोटघरे यांनी प्रवेशद्वार दान केले. नरेंद्र मेश्राम, रवींद्र मेश्राम, महेंद्र मेश्राम, विनोदजी मेश्राम, ऍडव्होकेट श्री.विलासजी तिरपुडे, बाबुरावजी गणविर, शिवा गणविर, प्रफुल रामटेके, धम्मपाल खोब्रागडे आणि पुरूषोत्तम मेश्राम यांनी छत्रदान केले. लिमजे दुय्यम निबंधक अधिकारी कुही, धनपाल बडगे सरपंच खोकरला, रोशन मेश्राम पोलीस पाटील मदनापुर, लक्ष्मणजी वासनिक केसोरी यांनी वृक्षदान केले.या सर्व दानकर्त्यांचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.तालुक्यातील सुंदर व विलोभनीय विहार निर्मितीत संघरत्न उके यांनी अहोरात्र केलेल्या कष्टांची प्रशंसा करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक : मा.डॉ.मधुकर रंगारी(सर्जन भंडारा)कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा.रणजित कुऱ्हे साहेब(जिल्हा महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी नागपूर) स्वागताध्यक्षा : मा. बाली संघरत्न ऊके(सरपंचा म्हसली गट ग्रामपंचायत) विशेष उपस्थिती: मा.भोजराज(बालु)ठवकर(माजी जि.प.सदस्य राजोला सर्कल),मा.वामनजी श्रीरामे (मा.उपसभापती पं.स.कुही), मा.इस्तारी तळेकर (मा.उपसभापती पं.स.कुही), मा.रोशन मेश्राम (पो.पा.मदनापुर), मा.ऍडव्होकेट दिलीप बन्सोड, मा.ऍडव्होकेट विलास तिरपुडे,मा.रविद्र मेश्राम (पं.बौ.उ. स्मा.स.म्हसली सहसचिव),मा.विनोद मेश्राम (पं.बौ.उ. स्मा.स.सदस्य),मा.नरेद्र मेश्राम (मा.सरपंच म्हसली), मा.रामचंद्र मेश्राम (मा.उपसरपंच म्हसली), मा.देवानंद ऊके(सामाजिक कार्यकर्ते उमरेड विधानसभा क्षेत्र),मा.राजु वाहने(मुर्तीकार),प्रमुख उपस्थिती:मा.उत्तम गजभिये सर,हर्षवर्धन डोंगरे सर,मा.संदेश रामटेके(म.पो.),मा.जितेंद्र मेश्राम (सरपंच रेंगातुर),मा.जितेंद्र गोंडाणे (मा.सरपंच), बाळकृष्ण गजभिये,धर्मदास खोब्रागडे, धनंजय तुमसरे, पिंकी राजेंद्र रोडगे,मा.नितेश मेश्राम (सरपंच साळवा),मा.पुरुषोत्तम मेश्राम (पं.बौ.उ.स्मा.स.अध्यक्ष), मा.विनाताई रेहपाडे (पो.पा.ब्राम्हणी), सौरभ रामटेके (म.वि.भि. मे.स. सदस्य), ताजुल रामटेके,राहुल बन्सोड (म.वि. भि.मे.स. अध्यक्ष),डी.टि.रामटेके,गजानन तितरमारे, लक्ष्मण वासनिक, भारत पाटिल,सुमित बन्सोड, सुरेश भदाडे,डॉ.धम्मा मेश्राम, गनिराम कारेमोरे, बिजाराम टेंभरे,कल्पना मेश्राम (स.सै. दल), धम्मजोती मेश्राम,नागनाथ चक्रधरे,धनराज पडोळे (मा.सरपंच हरदोली), धनराज गजभिये (मा.सरपंच बोरी), बुद्धपाल भोयर, बाबुराव गणवीर, तिलकचंद खोब्रागडे, रविंद्र रंगारी,गोपिचंद लुटे, सहादेव (नाना)लुटे, सुरेश रेहपाडे, ज्ञानेश्वर शेंडे (पो.पा. खरबी), सविता सोमा ऊके (मा. सरपंच हरदोली),बंडु ढोमण ऊके (मा.सरपंच म्हसली), उल्हास मेश्राम (पत्रकार), मा.धम्मदिप ऊके शिक्षक, मा.संघरत्न ऊके (पं.बौ.उ. स्मा. स. सचिव म्हसली), धम्मपाल खोब्रागडे (पं.बौ.उ.स्मा. स. कोषाध्यक्ष),प्रितम तिरपुडे (पं.बौ.उ.स्मा.स.सदस्य म्हसली) मारोतराव ऊके,लंकेश मेश्राम, हार्दिक कावळे,संघरक्षित बोरकर, सुनील मेश्राम,जितेंद्र ऊके,बुद्धरत्न ऊके,वनमाला मेश्राम,प्रिया रामटेके,अर्चना रंगारी, विरांगणा मेश्राम व इतर गावातील नागरिक उपस्थित होते.सर्व स्तरावरुन भरभरून कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.















