
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – हिंद नगर वर्धा येथील अमन चांदनखेडे यांच्या मातोश्री शांताबाई खुशाल चंदनखेडे ह्या 14 ऑक्टोबर रोजी धम्म चक्र परिवर्तन दिनीं त्यांचे निधन झाले.15 ऑक्टोंबर ला त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.16 ऑक्टोंबर रोजी रक्षा विसर्जन न करता बुद्ध टेकडी परिसरात बोधी वृक्ष लावून रक्षा विसर्जन करण्यात आले. त्याच बरोबर त्यांचे पती दिवंगत खूशालराव चंदनखेडे यांच्या नावाने सुद्धा बोधी वृक्ष लावण्यात आले. यावेळी चंदनखेडे परिवार व त्यांचे मुले विकास,अतुल, आधिश चंदनखेडे, व दोन मुली सौ.वंदना टेंभरे, दर्शना कवाडे, व नातीन श्रेयथ्री चंदनखेडे, अरिहा चंदनखेडे, आयरा चंदनखेडे, गुंजन टेंभरे, शांतून टेंभरे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ मेश्राम, रवी गणवीर, संदीप घागळे, कपिल चंदनखेडे, बाबाराव लांबसोंगे ,सुनील गेडाम, कपिल हातेकर, प्रदीप घोडेस्वार, तसेच बुद्ध टेकडी मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.















