prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाही तालुक्यात १० कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण

सिंदेवाही तालुक्यात १० कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण

0
99

विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावचा विकास व्हावा याकरिता शासन स्तरावर मतदार संघातील नागरिकांची रास्त मागणी घेऊन सतत पाठपुराव्यातून ती मागणी पूर्णत्वास येईपर्यंत स्वस्त न बसणारे विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांची कार्यपद्धतीच निराळी आहे. अशातच सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांच्या सुविधेकरीता शासन स्तरावरून १० कोटींचा विकास निधी मंजूर करून त्यातून पूर्णत्वास आलेल्या विकास कामांचे आज विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

लोकार्पण करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये तालुक्यातील अंतरगाव येथे ग्राम पंचायत भवन बांधकाम (अंदाजित किंमत ४८ लक्ष ५० हजार), सामाजिक सभागृह (२० लक्ष), आंबोली – रामाळा बोकडडोह नदीवर पूल व बंधारा (८ कोटी), शिवनी येथे आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम (१ कोटी), सामाजिक सभागृह बांधकाम (३० लक्ष) आदी महत्वपूर्ण कामांचा समावेश आहे.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शनपर बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी बाकावर बसून विपरीत परिस्थितीतही सरकारशी दोन हात करून क्षेत्राच्या विकासासाठी कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. क्षेत्रात हरित क्रांती व्हावी म्हणून शेतकऱ्यांचे हित जोपासत राज्यमंत्री असताना गोसेखुर्द प्रकल्पासाठी डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना 5 हजार कोटी इतका मोठा विकास निधी प्राप्त करून दिला व आज संपूर्ण ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. क्षेत्रा त वाहतुकीकरिता पूल, रस्ते गावांतर्गत रस्ते नाली बांधकाम, अभ्यासिका इमारत बांधकाम, आरोग्य केंद्र इमारत, प्रशासकीय प्रशस्त इमारती, नागरिकांची आरोग्य जपणे हेतू रुग्णवाहिका सेवा आरोग्य शिबिरे व शस्त्रक्रिया शिबिरे राबवून सामाजिक कार्ये प्राधान्य क्रमाने राबविली. आपण माझ्यावर दाखविलेला अतूट विश्वास याला कदापीही तडा जाऊ देणार नाही. तसेच भविष्यात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र हे राज्यातील सर्वात अग्रेसर विकसनशील क्षेत्र ठरणार अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. सोबतच नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी लवकरच रत्नापूर येथे नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असेही ते म्हणाले.

आयोजित लोकार्पण सोहळ्यास प्रामुख्याने सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे, गटविकास अधिकारी मोरे, सिंदेवाही शहरकाँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, विरेंद्र जयस्वाल, राहुल पोरेड्डीवार, संजय गहाने, सरपंच संघटनेचे राहुल बोडणे, रूपाली रत्नावार ,माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, अभिजीत मुप्पिडवार, पंकज नन्नेवार, महेश मंडलवार, अक्षय पेटकुले,सरपंच दीपाली ढाले, सर्वश्री ग्राम पंचायत सदस्य, काँग्रेसचे सर्व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते , बांधकाम विभागाचे अधिकारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here