
आप्पा हे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व होय…
सांगली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ढालगाव:कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषद गटातून बाजार समितीचे मा उपसभापती कोंडाजी आप्पा यांनी निवडणूक लढवावी अशी ढालगाव गटातून व तालुक्यातून सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांचा जोरदार प्रबळ आग्रह दिसून येत आहे
सांगली बाजार समिती उपसभापती व खरेदी विक्री संघ चेअरमन ,दूध संघ चेअरमन अशा अनेक माध्यमातून आप्पा यांनी सामान्य जनतेची कामे केली आहेत गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून आप्पा यांची गटामध्ये ओळख आहे म्हणूनच आपा हे सामंजस्य लोकांच्या सुख दुःखात धावून जाणारे निष्कलंक चारित्र्यसंपन्न नेतृत्व जनतेचे हित ओळखणारे नेतृत्व म्हणून आप्पांची ओळख आहे.
मतदार संघात आप्पा हे प्रत्येक लोकांची समस्यांची सोडवणूक करून त्यांना न्याय देणारे व लोकसंपर्क असणारे आप्पा हे नेतृत्व होय
*लढवय्या लोकनेता*
1980 साली कॉलेज विद्यार्थी नेता म्हणून झाली . त्यानंतर सामाजिक काम करत 2000साली दुधेभावी मध्ये विकास सोसायटी चेअरमन म्हणून विजयी झाले. 2000साली कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजयी होवून 2002 साली उपसभापतीपदी त्यांची निवड झाली. सलग 7वर्ष ते उपसभापती होते.खरेदी विक्री संघ चेअरमन व दूध संघ अशा अनेक संस्थेवरती पदे भूषविली* व *जत कवठेमहांकाळ, सांगली ,मिरज या मार्केट कमिटीचे त्रिभाजन होऊ नये म्हणून आप्पांनी बाजार समितीच्य उपसभापती पदाचा राजीनामा दिला व पदाचा त्याग करणारे एकमेव नेते होय अखेर त्रिभाजन होऊ दिले नाही* या काळात तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केल .*स्वतः ढालगाव ते दुधेभावी पायी चालत स्वतचे 10 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले* व पुढील उच्च शिक्षण ग्रज्युशन सांगली येथे केले व पुढे शिक्षक झाले स्वतः पायी चालून शिक्षण पूर्ण केले पण आप्पांच्या मनात एक खटकत राहील की मी जो संघर्ष केला तो पुढील पिढीला होऊ नये म्हणून गावामधे हायस्कूल चालू केली व विद्यार्थ्यांना 15 ते 20 किलोमिटर बाहेर शिकायला जावं लागत होत हा त्रास मुलांचा थांबविला त्यातून कित्येक मुले मुली आज शासकीय अधिकारी पत्रकार पोलीस. आर्मी मधे व कॉन्ट्रॅक्टर उद्योजक शिक्षक सामाजिक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. याचाच परिणाम उपसभापती व वी सो चेअरमन माध्यमातून मायबाप जनतेची सोसायटी माध्यमातून गोरगरीब लोकांची लाखो रुपयांची कर्ज माफ केली या शाश्वत विकासातून सर्वसामान्य व दीनदलित जनतेशी असणारी नाळ कधीही तुटू दिली नाही.
कवठेमहांकाळ तालुक्याच्या दुधेभावी सह ढालगाव पट्ट्यात शेतीला पाणी मिळविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
कोंडाजी आप्पा यांच्या संघर्षमय राजकीय जीवनातील काळात ते सर्वसामान्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, वीज दरवाढ, इरिगेशन अशा प्रसंगी रस्त्यावर उतरले आहेत. म्हणूनच कवठेम हांकाळ तालुक्यातील जनतेच्या हृदयसिंहासनावर आरुढ असलेले ते एकमेव नेतृत्व होय.
त्यांनी राजकीय जीवनात कधीही छक्केपंजाचे राजकारण केले नाही किंवा वारेमाप आश्वासनांची खैरात केली नाही. म्हणूनच सत्ताधारी नेत्यांचे विरोधात ३० वर्षे निःस्वार्थी व स्वाभिमानी कार्यकर्त्यांची भक्कम फळी त्यांनी उभी केली आहे. या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तर पुन्हा एकदा दंड थोपटून 2023 च्या रिंगणात उतरणार, अशी चर्चा निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळते. एका बाजूला सत्तेच्या बळावर नोकरी, पैसा व पदांची खिरापत वाढत असल्याचे चित्र असताना दुसऱ्या बाजूला कोंडाजी आप्पा पाटील गट यापासून अलिप्त आहे. तालुक्याच्या राजकारणात हा गट जिल्हा परिषद,पंचायत समिती वर प्रबळ दावेदार आहे. हे सांगली जिल्ह्यातील नेत्यांना ज्ञात आहे. हाच या गटाचा स्वाभिमान आहे. अशा संघर्षमय जीवन लाभलेल्या नेत्याला भावी येणाऱ्या 2025 जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठी संधी मिळावी यासाठी सामान्य कार्यकर्त्याची मागणी आहे.















