prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आली दिवाळी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आली दिवाळी

0
67

आली सजून दिवाळी
दीप लावले दारात
सोन पावलांनी आली
आज लक्ष्मी ही घरात।।१।।

दारी तोरण बांधले
हर्ष दाटला मनात
आज सुखाचा सोहळा
आले चैतन्य घरात।।२।।

झाले नातलग गोळा
वाटे गोकुळ घरात
आता आनंद फुलाला
सुख मायेना दारात।।३।।

केले दिवाळी फराळ
लाडू करंजी चकली
दारी लावले फटाके
मुले आनंदी नाचली।।४।।

केले लक्ष्मीचे पूजन
झाले कुटुंब आनंदी
वाढ फराळ चांगले
नाही आनंदाला बंदी।।५।।

लेक माहेराला आली
भाऊबीजच्या सणाला
आज सुखाचा सोहळा
करी हर्षित मनाला।।६।।

माझी सुखाची दिवाळी
घरी गोकुळ वाढले
नाद पैंजणाचा कानी
आज सुखात भिजले।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here