prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गुलाबी थंडी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गुलाबी थंडी

0
82

हिरवी पिवळी साडी नेसूनी
वर धुक्याची शाल घेवूनी
निसर्ग राणी शांत झोपली
नयनी स्वप्न घेवूनी रमली ||१||

परि हलक्याच रवीकरांनी
तिची अवेळी झोप मोडली
चैतन्यमयी त्या रविस्पर्शाने
निसर्ग राणी मनोमनी मोहरली ||२||

धुक्याचे त्या झाले मोती
दवबिंदू होवुनी आले धरती
सजली शेते सजली झाडे
मौक्तिक माले धरा सजली ||३||

आकाशी त्या रंग उमटले
वनराणी चे गोड हासणे
कुणी बरे हे चित्र रेखले
प्रभाती चे रूप देखणे ||४||

रोज नव्याने नवे पहाणे
देवाचे ते अमोल देणे
चैतन्यमयी या अनुभूतीने
जीवन बनते सुरेल गाणे ||५||

सौ. अंजली गरगटे.
पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here