
थोड़-थोड़ थंडी वाजतेय आता
संपतेय अक्टूबर नवंबर येतेयआता।
थंडी-थंडीवारा प्रकृति सोबती जोड़ती आता,
प्यार,दोस्ती आणि गर्म जोशीच्या
इज़हार होणारच आता!।।१।।
गुलाबी थंडीत कप-कपी कंपित काया आता,
थर-थर-थर-थर अधरांच्या येतेय आवाज़ आता।
ही गुलाबी थंडी ,ही सुंदर संध्याकाळ आता,आणि
त्यासोबतच मला तुझी
आठवण येतेय आता,
गोड गुलाबी थंडी दारावर
ठोठावते आता,
पेटयामध्ये लपवलेल्या शाल, मफ़लर आणि कोटांना हांक मारतेय आता!।।२।।
हे शांत क्षण,हे गुलाबीथंड दिवस
ही थंड रात्री ही भटकंती झोपेचे ओझे आता,
हे सगळी आठवणी चिकटून
शरीरावर चादरीसारख्या आहेत आता!
मंद गोड गुलाबी थंडी आणि
वा-यात वाहणा-या फुलांचा
सुगंध चांदण्या रात्री तुझा स्पर्श
आकाशाकडे पाहिल्यानंतर
मनात कितीतर त्या अतीतांचा क्षण जाग्या झाल्याआता!
हे गुलाबी थंडी थोड़ी थांब ना ज़रा
ही थंडाच्या रात्री शेकोटी पेटवून माझीच वाट बघत आहे माझा आपला कोणी तरी असं वाटतय रे!मला! आता !।३।।
सौ अनुराधा लक्ष्मण मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना.















