
संत तुकडोजी महाराज म्हणतात
परधर्म म्हणजे आंधळेपणे विकाराच्या स्वाधीन होणे
व स्वधर्म म्हणजे न्यायाच्या डोळस मार्गाने जाने होय .
थोर लोकानी परधर्म कोणता व स्वधर्म कोणता
ओळखण्यास हे तत्व सांगून ठेवले आहे
आपला नातलग म्हणून त्याला पोटाशी धरावे व दुसऱ्यास
दुर लोटावे असे कोणी ऋषी मुणी वागल्याचे त्यांची
अपकीर्ती करणारे उदाहरण कुठेच सापडत नाही .
एखाद्याच्या ठिकाणी सद्गुण आहेत म्हणून त्याला वंदन
करायचे, ते वंदन त्या सदगुणाला पाहून आहे. यात जात धर्म
याचा संबंध कुठे येतो ? एखादा हिंदू उघड उघड पाप
करत असेल तरी आपण मान का द्यावा?
एखादा मुसलमान सदवर्तनी असेल तर, तरी तो केवळ मुसलमान आहे म्हणून, त्याची निंदा करणे हा न्याय कोणी सांगितला. एखादा ख्रिस्ती परदेशातून आलेला आहे व त्याने मरेपर्यंत भारतातील दीनदुबळ्याची सेवा केली असेल किंवा त्याने तुमच्या धर्मात बिघाड केला नसेल, तरी तुम्ही त्यास दुर लोटावे हे मनाला पटण्यासारखे नाही .
जो सत्याचा पुजारी आहे ,त्यांची बुद्धी त्याला विश्वासावर
प्रेम करायला सांगते. तो कोणत्याही धर्म समाजाचा असो
त्यास आपले पणाने वागविले पाहिजे.
मानवता माणुसकीला धर्म म्हणतात. अज्ञानामुळे धर्माच्या मुळ तत्वाचा लोप पावला, महंतपणा बुवाबाजी वाढली व सांप्रदायिक वृती बोकाळली हे असे चालत आल्यामुळे धर्म मातीत मिळाला धर्माचे कंबरडेच मोडल्याने ते पुन्हा उठून उभे राहणे कठीण झाले आहे.
आपणास मानव म्हणतात, म्हणूनच आपला सर्वाचा
स्वधर्म मानवधर्म माणुसकी हा आहे. हे धर्माचे सत्य
रहस्य तरी ध्यानात ठेवा. न्याय,निती ,शुद्ध चरित्र , प्रेम
या साधणानी जो धर्म समाजाची धारणा घडण करतो तोच धर्म मला मान्य आहे. त्यांच्या भंजनातून ते सांगतात
हाती न घेता तलवार ,राज्य करी जगावर त्यासी… कारण एक प्रचार हे धर्माचे मर्म जोवर कोणी समजत नाही तोवर कोणी स्वतास धार्मिक म्हणवून घेत असेल तर ती धर्माची अपूर्ण लक्षणे आहे असे मी मानतो.
अहो ! आपण ग्रंथ रचला आणि तो देवाच्या माथी का लावावा ? या ठिकाणी देवाची मध्यस्थी पाहिजे कशाला?
असेच देवाधर्मावर विश्वास ठेवून लोक दुर्बल ,परावलंबी,
आळशी होऊन भिकेला लागले आहेत. म्हणून आतातरी
देव देव करणे सोडून द्या ! “असे तुकडोजी महाराज म्हणतात.
अज्ञानामुळेच अधोगतीला नेणारी कुसंगती लागून विकार
बळावतात व त्या मुळे सत्या सरूप देवाची प्राप्ती होत नाही.
म्हणूनच ज्ञान हवे, ज्ञान हेच तुझे दर्शन आहे. ज्यामुळे सर्वात व्यापलेला व आंनद रूपाने हृदयात अनुभवास येणारा देव लाभतो. यापुढेही जाऊन तुकडोजी महाराज म्हणतात कर्तव्य शुर, न्याय -नितीचे माहेर घर म्हणजे देव!
काळ परिस्थितीनुरूप निसर्गात समाज परिवर्तनाची क्रांती घडविणारा जिवंत झरा म्हणजे देव! मानवतेचा उच्चतम नमुना म्हणजे देव! मानवांचा श्रेष्ठ आदर्श म्हणजे देव त्यांचे कार्य लक्षात घेऊन पुढील पिढीला स्फुर्ती दायी ठरावे. म्हणून देवाचे नाव घेतले. हे देवाचे मुख्य वर्णन नव्हे तर सर्वोत्तम मानव म्हणूनच कार्य लक्षात येण्यासाठी व तसे आचरण्यासाठी हे देवाचे वर्णन केले आहे.
ग्रामसेवा हीच राष्ट्रसेवा आहे राष्ट्रसेवेतच इश्वर सेवा घडत असते हा उत्तम अनुभव स्वत तथा इतराना ही व्हावा.
अशाच आशयातून तुकडोजी महाराजांनी गावसुधारण्या
वर भर दिला, अंधश्रद्धा कर्मकांड, भेदभाव निवारण
विवाह पद्धती, तीर्थयात्रा व बुवाबाजी या पासून
कशाप्रकारे सावध राहीले पाहिजे यावर खुप छान पद्धतीने उदाहरणे देऊन भजन कीर्तनातून समाजासमोर मांडले आहे.
लोक जर खरा धर्म समजून घेतील तर अनेकांना एकच तत्व भरलेले पाहतील व मग परकियाचा धर्मातंराचा स्वार्थ हेतू साध्य होणार नाही. या करिता लोक शिक्षणाचे उत्तम साधन जे भजन कीर्तन त्यातूनच प्रपंच परमार्थ धर्म हे सर्व आवश्यक ज्ञान लोकांना शिकवावे , जे जे ज्याला येत असेल. ते त्याने दुसऱ्यास शिकवावे. चांगल्या गोष्टींचा फायदा प्रत्येकाला मिळवून द्यावा हाच माणुसकी धर्म आहे.
तो ज्या गावाचे काम हाती घेईल त्या गावाचा उध्दार होईल व तेच गाव खऱ्या अर्थाने इथे स्वर्ग बनेल .
सर्व जिवजंतुच्या कल्याणार्थ झटणे हे एकच कर्म संताचे
आहे असे ते सांगतात. परस्परात सर्वाचा बंधुभाव वाढवावा सज्जनाचा गुणगौरव कौतुकाने करावा . आपला मोठेपणा विसरून संत सत्याचा महिमा वाढवितात चुकूनही प्रतिष्ठेला वा वैभवाला भुलून ते आडमार्गाने जात नाही. म्हणून संताची संगत करा असे तुकडोजी महाराज म्हणतात.
सर्व ग्रामाला सुखी करावे |अन्न वस्त्र पालादि द्यावे |
परि स्वत: दु:खची भोगावे | भुषण तुझे ग्राम गाथा |
हा संदेश सुरवातीलाच ग्रामगीता देते .
श्री संत तुकडोजी महाराज यांच्या ग्राम सेवेच्या बाबतीत
अधिकार फार मोठा आहे, “आधी केले मग सांगितले “
हे त्यांच्या बाबतीत अक्षरशः खरे आहे.
‘ खेडी सुधारा ‘ असे नुसते सागून भागत नाही .
सुधारणा कसली करा कशी करा वैगरे प्रश्न राहतातच……
भजन कीर्तनातून खेड्यांच्या विकासासाठी व खेड्याच्या
सौंदर्यीकरणावर भर देणारे संत तुकडोजी महाराज
यांच्या ग्राम गितेतून अंधश्रद्धा, व्यसन, देव, साधू संत ,
राजकारण, खेळाडू, शेती, व्यवसाय ,निती समाजधोरण
विवाह पद्धती, तीर्थयात्रा , कर्म धर्म, चालीरीती,
रूढी परंपरा, पापपुण्य, ध्यान साधना, मंत्रतंत्र अशा
जटील प्रश्नाने भरलेली ग्राम गिता म्हणजे ग्रामीण भागात
लोकांच्या विकास दृष्टीकोनातून असलेली
निती नियम,संस्कारासाठी मौलिक विचाराची जणू पर्वणीच. ….?
नंदा भगत / कारंजा लाड
वाशिम















