prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आली दिवाळी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आली दिवाळी

0
83

आली आली दिपावली
नव चैतन्य घेवूनी
मांगल्याचे दीप सारे
सजले आनंद लेवुनी

सारे रोजचेच आहे
तरी नव्याने पाहते
दारी तोरण लावते
घर उत्साहात नहाते

झाला फराळ खमंग
अन्नपूर्णा मुग्ध हसली
रंग नवतीचे लेवुन
दारी रांगोळी सजली

बाजाराच्या घाई गर्दीत
जीव माझा झाला गोळा
सोनुल्याच्या खुशिसाठी
खिसा बाबाचा मोकळा

रोषणाईने नटलेल्या
दारे खिडक्या हसून
पणतीच्या प्रकाशात
पाहती मलाच फिरून

सुगंधी उटण्याचा
दरवळ भवताली
नव्या पैठणीची घडी
पाडव्याला मोडली

आली प्रेमाची भाऊबीज
जपते रेशमी नाती
ओवाळीते भाऊराया
पंचारती घेऊन हाती

सौ.वंदना शशिकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here