prabodhini news logo
Home ठळक बातम्या वर्धा येथे पोषण आहार सप्ताह संपन्न

वर्धा येथे पोषण आहार सप्ताह संपन्न

0
312

वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – पोषण माह अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन एकात्मिक बाल विकास सेवा योजना वर्धा येथे ८ वा राष्ट्रीय पोषण आहार माह अभियान सांगता समारंभ अंगणवाडी केंद्र क्रमांक १८ गोटे ले-आउट साने वाडी येथे संपन्न झाला.

अंगणवाडी सेविका सुनंदा मुन यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सर्व प्रथम प्रमुख पाहुणे पर्यवेक्षिका मा.दिपाली तांगडे, पर्यवेक्षिका मा.वाघ, माजी नगरसेविका मा.भारती खोंड,माजी मुख्याध्यापिका व समाजसेविका मा. डॉ.मंदाकिनी जवादे, यु.पी.एस.सी.च्या मा.प्राची, प्रा.मा. भोंगाडे इत्यादी पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सुंदर अशा स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमात विविध प्रकारच्या स्पर्धां घेण्यात आल्या त्यात वार्डातील लाभार्थी (पालक), अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोषण आहार थीमवर सुंदर अशा रांगोळी काढल्या तसेच पाक स्पर्धा ही घेण्यात आली स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले छोट्या बालकलाकारांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर केले.तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सुद्धा पोषण आहार थीमवर सुंदर असे नृत्य सादर केले.या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अंगणवाडी सेविका सुनंदा मुन, संगिता मोरे, अर्चना तामगाडगे व त्यांची संपूर्ण टीम यांनी केले.मंचावर सर्व पाहुण्यांनी पोषक आहार विषयावर मोलाचं मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गर्भवती माता, स्तनदा माता, पालक व किशोरी मुली इत्यादी हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता भगत (लाभार्थी) यांनी केले. प्रास्ताविक मा. दिपाली तांगडे यांनी केले.व आभारप्रदर्शन अंगणवाडी सेविका रत्नमाला जवादे मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना मिष्ठान्न वाटप केले.अशा प्रकारे पोषण आहार माह अभियान सर्वांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here