
पद्मानंद कांबळे जिल्हा प्रतिनिधी वर्धा – वर्धा जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणूका मध्ये आजाद समाज पार्टीने स्वबळावर उमेदवार उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निर्णयाची घोषणा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रूपचंद टोपले, तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव दिगंबर पलटणकर, व वर्धा जिल्हा प्रभारी सुनील देशमुख, त्याचप्रमाणे वर्धा जिल्हा अध्यक्ष मनीष फुसाटे यांनी सांगितले की, राज्यात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस घराणेशाही, भ्रष्टाचार, अन्याय आणि अत्याचार वाढत आहेत. सत्तेला चिकटलेले सत्ता धारी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यरत आहेत. तर कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता महागाई, शिक्षण व आरोग्याच्या गंभीर समस्यांनी त्रस्त आहे.
ते पुढे म्हणाले या अन्याय विरोधात आणि सर्वसामान्यांचा प्रश्नांना न्याय देण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधाराच्या कार्यकर्त्यांना पुढे आणणे गरजेचे आहे. म्हणूनच आजाद समाज पार्टी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वबळावर लढणार आहे. फूसाटे यांनी स्पष्ट केले की, आजाद समाज पार्टी ही सर्वसामान्य जनतेची वंचित बहुजनाची आणि कष्टकरी वर्गाची खरी प्रतिनिधी आहे. जनतेच्या प्रश्नावर भक्कम नेतृत्व उभे करून समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. तसेच त्यांनी इच्छुक कार्यकर्ते आणि समाजसेवकांना आवाहन केले की आगामी निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्यानी वर्धा जिल्हा अध्यक्ष मनीष फुसाटे मो.नंबर 9860469894 तसेच सुनील देशमुख वर्धा जिल्हा प्रभारी मो.नंबर 9372875041, दिगंबर फलटणकर महाराष्ट्र प्रदेश सचिव मो. नंबर 8806703401, रूपचंद टोपले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोबाईल नंबर 8830847245 यांच्याशी संपर्क साधावा. या निवडणुकामध्ये आजाद समाज पार्टी नव्या राजकीय विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवेल. असा ठाम विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.















