
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – शिवश्री प्रतिष्ठान पुणे या सामाजिक संस्थेतर्फे गौरवशाली मानकरी ठरलेल्या कु. सायली बाळू ढेबे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान आनंदी पुणे येथे करण्यात आला. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक तसेच पत्रकारिता व साहित्य लेखन अशा विशेष कामगिरीचा आढावा घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात अन्वी घाटके (गिर्यारोहक), मदन रेनगडे पाटील (संस्थापक शिवप्रतिष्ठान), मा. प्रतीक्षा जाधव (सिनेतारका), डॉ. हेमंत वसेकर (पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र राज्य), मा. सुवर्णा कुऱ्हाडे (सामाजिक कार्यकर्त्या) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.















