prabodhini news logo
Home ठळक बातम्या सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

0
119

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. ३१ सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी संतोष वंजारी यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी दिव्या गोसावी, सुरज चौधरी, कैलास खलाणे, विशाल अधिकारी, ज्योती गावित, सुरेखा घायवट, सुदर्शन महाळूंगे, योगेश राऊत आणि कायराबाई पवार उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या कार्याचा ध्यास घेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याच्या त्यांच्या विचारांचा आदर्श अंगीकारण्याची प्रतिज्ञा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here