
आपण कोण आहोत
पैसा इतका का महत्वाचा l
पैसा सर्वकाही नाही माध्यम
एक मार्ग देवाणघेवाणीचा l
पूर्वी पैशाच्या जागी वस्तू
विनिमयाचा उपयोग व्हायचा l
आज वस्तू देण्याऐवजी
पैसा मौल्यवान प्रत्येकाचा l
पैसा बोलायला लागला
तो करू शकतो काहिही l
जीवनात पैशाची शक्ती
देतो प्रभावाची ग्वाही l
पैशाचा वापर व्यवहार
असावा अत्यंत पारदर्शक l
फसवणूक गुन्हेगारीतून
अवैध पैसा विनाशक l
पैसा राजकिय सामाजिक
आर्थिक क्षेत्रात पाडतो प्रभाव l
मागणी जास्त पुरवठा कमी
मग वाढतो मालाचा भाव l
पैसा आर्थिक साधने
सुरक्षा आरामाची देतो हमी l
उच्च दर्जा उच्च जीवन
गरजांचा होतो ताण कमी l
पैसा सक्षम असला तरी
त्याला देखील आहेत मर्यादा l
कल्याण नैतिकता मानवी संबंध
मैत्री समाधानातच फायदा l
पैसा हेच सर्वस्व नाही
पैसा जरुर जरूर कमवावे l
पण त्यासाठी आयुष्यातले
सुंदर क्षण मात्र नाही गमवावे l
प्रा. हंसराज रंगारी
कल्याण















