
गोड गुलाबी रंगांची
सदाफुली मी सुंदर
रुप माझेच मजला
वाटे असे मनोहर।।१।।
पाने हिरवी हिरवी
रूप रंग मी पहाते
येता बहर फुलांचा
मीच हरवून जाते।।२।।
कळी पाकळी नाजूक
नाही कुठला सुवास
मीच माझ्या ग मनाची
राणी ही होतेच खास।।३।।
गुण माझे हे औषधी
बरी जखम करते
लावा चोळूनही पाने
जंतू नाशक असते।।४।।
तिन्ही ऋतूमध्ये येते
मीच हे सदाबहार
रहा हसत नेहमी
मिळे जीवना आधार।।५।।
नाही मला कोणताही
कधी कुठलाच गर्व
निसर्गाची मुले आम्ही
राहु आनंदीच सर्व।।६।।
प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे,लातूर















