prabodhini news logo
Home अमरावती प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – गुलाबी थंडी

प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – गुलाबी थंडी

0
143

महिना हा डिसेंबरचा
जोर थंडीचा कळेना

आसमंत हा सारा गार
गुलाबी थंडी सरेना

चिवचिवाट हा पाखरांचा
सकाळ होता ऐकाना

चहाचा हा गरम घोट
उबाला देईल मना

गुलाबी थंडीचा हा आवाज
कानी कधीही पडेना

रात्र लहान,दिवस हा मोठा
निसर्गाचा खेळ कुना समजेना

आयुष्याचा हा सार शिका
ऋतू सगळे प्रामाणिक ना

माणसातील हा माणूसपणा
शिकवतो निसर्गच सर्वांना

प्रा.सिम्रेला देशमुख
अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here