prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पैसा

प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पैसा

0
96

पैशावर चालते दुनिया
पैशानीच मिळते सारे
पैशासाठी होतो खुन
पैशाचेच वाहतात वारे

पैसा जवळ असेल तेव्हा
समाजात मिळतो मान
पैसा नसेल तेव्हा
होतो सगळीकडे अपमान

पैसा हातात असता
नसते शांत झोप
गरीबाला वाटत राहते
कधी मिळेल खुप

पैशामुळे माणसाचा
अहंकार वाढत गेला
पैशामुळे माणुस सख्खी
नाती विसरला

पैसा गरजेपुरता ठेवा
नका करू हव्यास
देशोधडीला माणूस जातो
लक्षात ठेवा खास

सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here