
रम्य अशी पहाट
किती सुंदर असते
इवल्याशा फुलांची
मस्ती बागेत दिसते।।१।।
लाजळूचे झाड सुध्दा
किती लाजते हो गोड
होता स्पर्श आनंदाचा
अंग शहारते तिचे थोडं।।२।।
प्राजक्ताची रांगोळी
पडते माझ्या दारात
सुंगध ही पसरतो
आजूबाजूच्या घरात।।३।।
कोवळे सोनेरी किरण
माझ्या दारात येतात
उठा उठा हो सर्वजण
हेच सांगत राहतात।।४।।
गुलाब पाहून सुंदर
मला हसू येते खूप
खुणावते मजला मग
त्याचे मनमोहक रूप।।५।।
हसरी ती सदाफुली
माझ्या दारात डोलते
आमच्या टॉमीला सुद्धा
किती गुलगुलू बोलते.।।६।।
आमचा टॉमी हीआहे
खूपच सुंदर नि हुशार
जणू वाघच वाटतो
सर्वांना खरंच यार।।७।।
या सगळ्यामुळे माझी
मनमोहक पहाट होते
म्हणूनच हसत खेळत
मी सदा सर्वकाळ राहते।।८।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर















