
रम्य पहाट सुंदर सकाळ
दिवसाच्या सुरुवातीला l
सकाळचे शांत वातावरण
शुद्ध हवा उत्साह भरलेला l
सूर्य उगवला आकाश गुलाबी
नारिंगी सोनेरी रंगानी रंगलेले l
फुलांचा सुगंध घेऊन जाणारी
हवा गवतावर दवबिंदू पसरलेले l
पक्षी गातात सर्व जग शांत
सौम्य नैसर्गिक आवाजाच संगीत l
कोणत्यातरी जातीचे पक्षी
तारेवर बसले एका पंक्तीत l
पहाट सर्व काही शांत तेजस्वी
नाविन्यता शक्यतांनी भरलेली l
हवा शीतलतेचा काळ दिवसाचा
आवाज गर्दीची वेळ नसलेली l
सुंदर सकाळ ही दिवसाच्या
नवीन सुरुवातीचे प्रतीक l
ती दर्शवू शकते यात एक अर्थ
प्रतिकात्मक आणि भावनिक l
एक नवीन ताकद नवी उमेद
पुन्हा नव करण्याची आशा l
ही मनाची शांती निसर्गाची
कृतज्ञ रहा सोडून निराशा l
प्रत्येक दिवस वाढण्यासाठी
प्रगतीसाठी बदलण्यासाठी l
निसर्ग नुतनीकरणाची संधी देतो
स्वतःचा विकास करण्यासाठी l
लोक अनेकदा आज हवा छान
रम्य पहाट आहे असे म्हणतात l
ते आनंदाच्या आशावादाच्या
आंतरिक स्थितीचे वर्णन करतात l
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















