
घरात नांदावी शांतता
असावी नात्यांची साथ
मिळून मिसळून नांदावे
साऱ्यांना द्यावा आनंदाचा हात
घरच्या मंडळीची असावी
बांधिलकी मनाची खरी
हसत खेळत राहावे तेव्हाच
नांदते घरी सुख-समृद्धींच्या सरी
वीट ,रेती, सिमेंट, काँक्रीट
यांनी तर बनते घर मजबूत
प्रेमाच्या धाग्यांची असावी नाती
तेव्हाच होते नात्यात समजूत
मतभेद जरी झाले नाते
मनभेद कधीच होऊ नये इथे
घर होईल तेव्हाच सौख्याचे
आशा विश्वास वाहतो जिथे
रंजना भैसारे, नागपूर















