prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – घर

प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – घर

0
96

घर माझे हे सुंदर
जणु राजेशाही थाट
छोटेसेच आहे पण
खुप त्याचा थाटमाट

तीन खोल्यांमध्ये
माझा संसार मांडला
प्रशस्त बाल्कनी त्यात
डुले पक्षांचा बंगला

सकाळी सकाळी होतो
पक्षांचा किलबिलाट
साळुंख्या, चिमण्या
शीळ घालतो भाट

माझ्या घरात असती
दोन गोंडस बाहुल्या
बापावर त्यांची माया
दिसे आम्हा दोघांच्या सावल्या

सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here