prabodhini news logo
Home धुळे प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – घर

प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – घर

0
238

“माझ्या घरात गोकुळ आलं मन आनंदान न्हाल जशी अमृताची धार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार”

“चिमणी पाखरं” या चित्रपटातील गाणं “घर” ही अमूर्त छबी मनात तयार करते.
“घर” ही संकल्पना केवळ निवासाची जागा इतकी मर्यादित नसून ती प्रेम, सुरक्षा, आराम आणि कुटुंबासोबतची नाती दर्शविते.
घर या संकल्पनेत मानसिक शांतता, आपले पणा, आणि आपुलकीची भावना समाविष्ट आहे जी एका घराला ” घरपण ” देते व “आपले घर” ही सुंदर भावना निर्माण करते.

भारतीय संस्कृतीत घर हे एक संस्कार केंद्र आहे, भावनिक व सामाजिक केंद्र आहे. धर्म रुजविण्याचे सर्वोत्तम स्थान आहे.

घराच्या चार भिंती ह्या संरक्षण व सुरक्षितात प्रदान करतात तर घराचे छत आत्मनिर्भर*ता दर्शविते ,….घराचा *दरवाजा आत्मसन्मान जागवितो,
घराचा उंबरठा मर्यादा लक्षात आणून देतो.
घराचे अंगण घराला घरपण देते.
” घर हे माझे आनंदाचे दाराशी सुरेख नक्षी ” अशी मनभावन गाणं उदयास येतात ती अंगणतील सारवलेल्या जागेत रेखाटलेली नक्षीदार रांगोळी.. ही आनंदाने अतिथीचे स्वागत करतांना भासते.

इतकंच काय तर “घर दोघांचे… घरकुल पाखराचे” अशी हृदय स्पर्शी गाणी ही प्रचंड प्रसिद्ध आहेत…

आई च्या पदाराशी घर ही संकल्पना तंतोतंत जुळते.. मायेची सावली, गारव्यात ऊबदार, संरक्षण , माया, ममता, ओलावा, जिव्हाळा, प्रेम, स्नेह, तितकंच मिळते जितके घरात

घर शब्द उच्चारला की प्रत्येकाच्या घराची स्वप्न, संकल्पना, रचना, आकार, ही नक्कीच वेगवेगळी असतात.

घराला आपण अनेक विशेषण लावून उच्चारतो. घर, गृह, निवास, सदन, भवन, महाल, राजवाडा, धाम, निकेतन, आगार, आलय, निलय, गेह, वसतिगृह, आश्रम, पर्णकुटी, झोपडी इत्यादी
घर कश्याने बांधले आहे, त्यात कोण राहते यावरून घराचा प्रकार पडतो. राजा राहतो तो राजवाडा , गरीब राहतो ती झोपडी , आश्रयाला राहतात ती आश्रम , साधू संत राहतात ते धाम , विद्यार्थी घडतात ते गुरुकुल , अनेक घरे एकत्र येतात ते संकुल , शासकीय योजनात मिळते ते घरकुल अश्या विविध संकल्पना ह्या घरा विषयी आहेत.

आपण राहतो त्या घरात आपलं बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धापकाळ या घरात घालवलेला असतो. त्याच्या आठवणी कानकोपऱ्यात, जागोजागी, प्रत्येक वस्तुत आठवणी जुळलेल्या असतात… आणि म्हणूनच घर हे स्वर्गाचा भास देते..

घर मंदिर से नहीं वो कम, तुम रख दो जहाँ पे कदम….

ये मेरा घर, ये तेरा घर किसीको देखणा अगर तो पाहिले आके मांगले तेरी नजर, मेरी नजर अशी असंख्य गाणी ही घर या संकल्पनेवर आहेत…

घराचे गोकुळ, नंदनवन, धाम करणं हे घरातील सदस्यांचे हातात असतेच
परंतु कधी कधी नियतीने हे गोकुळ भग्न होते… आणि

घराची पडझडंच घर तुटते असे नाही तर घरातील कर्ती व्यक्ती गेली तरी घर कोलमडून पडतं…

कशी काळाची चाहूल आली
बाग सुखाची करपून गेली
कसं विपरीत घडलं सारं
होता सोन्याचा संसार

सुनंदा निकम
धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here