prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – रम्य पहाट

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – रम्य पहाट

0
109

फुलून आली आंनदाने पुर्वेस लाली
निरभ्र होऊन आकाश प्रसन्न शितल
सुटला पहाट वारा डोलू लागले लता वेली
पाखरांची सुमधूर गाण्याची किलबिल —!!

धुक्यात हरवलेली शुभ सकाळ
अंधारलेल्या वाटेत शुभ्र थाट
जनू क्षितिजाने पांघरली शाल
मंद थंड वारा वाहत उजळली पहाट—!!

ऋतु हिवाळा गार गार वाहे गारवा
वाहे मंद वारा दाटली धुक्यानीं वाट
शुभ्र वस्त्र नेसून वसुंधरा आनंदली फार
पर्णावर दवबिंदूचे मोती साचले
दाट—!!

तुषार धुक्यांचे सौंदर्याने सजली सृष्टी
रात्र दाट धुक्यानीं न्हाऊन निघाली
रम्य पहाट प्रसन्नतेत उजळीत आली
सुर्यकिरणांनी प्रकाशित होऊन फुलली —!!

जनू मोत्यांची रास पानावर मोती टिपली
डोलती वृक्ष डौलाने निसर्गरम्य धरतीवरी
अदृश्य दिसे धूर जिकडे तिकडे भासे क्षितीज
तृणया हिरवी बरवी दाटले धुके सोनेरी —!!

सौ. सविता संजय भोयर
राजुरा जिल्हा चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here