
प्रेमळ नात्यांच्या भिंतींचे पूर्वी घर होते नाव,
जसे प्रेम, आपुलकी, नात्यांचं वसलेले किलबिलते गाव.
आजी-आईच्या हातच्या जेवणाला चुलीचा वास,
आणि वडिलधाऱ्यांच्या शब्द होता सगळ्यासाठी खास.,
गप्पा, हशा, गोष्टी नुसती हास्य जत्रेची चाल.
अशीच सुंदर असायची रोज संध्याकाळ.
आता घर म्हणजे झालय “रूम नंबर फोर”,
Google map वर दाखवलेलं कुठलेसे फ्लोर.
किचन म्हणजे झालय मिक्स्सर -ओव्हनचं ठिकाण,
आणि जेवण म्हणजे Zomato – Swiggyचं अन्नदान.
भिंतींवर राहिल्या नाहीत नात्यांच्या आठवणी आता,
फक्त Wi-Fi चं पासवर्डच करतोय सगळी सांगता.
पूर्वी घर होतं एकजुट मनाचं ठिकाण,
आता “वन नाईट स्टे”चं बनलय निवासस्थान.
दरवाज्यावर सोनेरी “Welcome” लिहिलं,
पण आत मात्र सगळ्यानीच हृदयाची बंद केलं.
घर आता केवळ पोस्टल पत्ता झालं,
माणसात माणसातील सुसंवादाचा आत्मा कुठेतरी हरवून बसल
प्रांजली चौधरी
गोवा.
















I am very happy to see my poem on your channel. Thank you for understanding.