prabodhini news logo
Home चंद्रपूर उपायुक्त मंगेश खवले यांना भावपूर्ण निरोप

उपायुक्त मंगेश खवले यांना भावपूर्ण निरोप

0
115

चंद्रपूर महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून उत्कृष्ट कार्य पार पाडणार मंगेश खवले यांची बदली होऊन ते नागपूर महानगरपालिका उपायुक्तपदी रुजू झाले आहेत. त्यांच्या बदलीनिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध उपक्रमांना गती दिली.
आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे, नेतृत्वगुणांचे आणि सौजन्यपूर्ण वर्तनाचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, नगर सचिव नरेंद्र बोबाटे, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, सहायक आयुक्त अनिलकुमार घुले यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
चंद्रपूर मनपात दिलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी धन्यवाद आणि नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here