
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – वाशिम : महाराष्ट्र शासनाचा, समाजसेवकांना दिल्या जाणारा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘अखंड सेवाव्रती’ मा.दिनेशबाबू वाघमारे आणि मदतच्या मार्गदर्शक तथा त्यांच्या अर्ध्यांगीनी सुनंदा वाघमारे यांचा महाराष्ट्रातील नामांकित असलेल्या विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा,महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद महाराष्ट्र,अकोला आणि स्त्री शक्ती मंच महाराष्ट्र, कारंजाच्या वतीने,आमदार विकासभाऊ ठाकरे,आमदार पदवीधर आमदार अभिजीत वंजारी,राधिकादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक गिरीष पांडव यांचे प्रमुख उपस्थितीत,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यीक,लोककलावंत तथा पत्रकार आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,महिलाध्यक्षा कांता लोखंडे, महाराष्ट्र भूषण पत्रकार विजयबाबू तेलगोटे,स्त्री शक्ती मंचच्या शारदा भुयार, गानकोकीळा आशा सुरवाडे यांच्या शुभ हस्ते शाल,पुष्पगुच्छ देवून नागपूर येथील मदत राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
उल्लेखनिय म्हणजे दिनेशबाबू वाघमारे यांनी बालपणापासूनच राष्ट्रसंत श्री महाराज,कर्मयोगी तुकडोजी संत गाडगेबाबा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा पुरस्कार करून,अहोरात्र महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाऊन तळागाळातील बहुजन समाजाची तन-मन-धनाने मदत केलेली आहे.तसेच आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसाराकरीता सकल आयुष्य वेचलेले आहे. त्यामुळे नुकतेच काही वर्षापूर्वी त्यांच्या एकसष्ठी निमित्ताने जीवन गौरव सोहळ्यात,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांची जीवनगाथा आपल्या लेखनीद्वारे जीवनगौरव विशेषांकात मांडली असता संपूर्ण महाराष्ट्र भरातून दिनेशबाबू वाघमारे यांच्या चरित्रपर,साहित्यीक संजय कडोळे यांनी लिहिलेल्या लेखाला भरभरून प्रतिसाद मिळून दिनेशबाबू वाघमारे यांचा
गुणगौरव झाला होता.नुकत्याच २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार समारंभामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते दिनेशबाबू वाघमारे यांना नागपूर विभागामधून शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण (दलितमित्र ) पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या आंबेडकरी चळवळीच्या महत्तम कार्याचा आणि सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून विदर्भ लोककलावंत संघटनां कारंजा कडून पुनश्च गौरव करण्यात येणार आहे.असे वृत्त ग्रामिण माहिला पत्रकार कांता लोखंडे यांनी कळवीले आहे.















