prabodhini news logo
Home चंद्रपूर जागतिक निमोनिया दिवस व सांस अभियान साजरा.

जागतिक निमोनिया दिवस व सांस अभियान साजरा.

0
120

वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज – दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक निमोनिया दिवस व सांस अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक, डॉ. अश्विनी गेडाम स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. प्रतिक गोजे बालरोगतज्ञ, वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका मंचावर उपस्थित होते. उपस्थितांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
वंदना बरडे अधीसेवीका यांनी प्रास्ताविक केले.त्यात त्यांनी जागतिक निमोनिया दिवस व सांस अभियान याविषयी सविस्तर प्रास्ताविक केले. तसेच कार्यक्रमाचा उद्देश, नियोजन, उपाय, प्रतिबंध, त्यांच्या माहीतीचा प्रचार व प्रसार याविषयी प्रास्ताविक केले.डाॅ. खुजे वैद्यकीय अधिक्षक यांनी जनजागृती विषयी मार्गदर्शन केले, डॉ.अश्वीनी गेडाम स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी स्त्रियांच्या समस्या विषयी माहिती दिली.डाॅ. गोजे बालरोगतज्ञ यांनी निमोनिया विषयी माहिती दिली.सोनल भगत अधिपरिचारीका यांनी प्रसुती पुर्व व प्रसुती पश्चात विषयी माहिती दिली.सतिस येडे सहायक आरोग्य सेवक यांनी सुत्रसंचालन केले व लसिकरणाची माहीती दिली.आभार प्रदर्शन स्वेता गलफाडे अधिपरीचारिका यांनी केले.सोबत वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी सि. सि. पी. टोल फ्री नंबर व त्याची माहिती व १००० दिवसाचे महत्त्व,१०८ व १०२ व १०४ व गर्भसंस्कार विषयी माहिती दिली .हे अभियान १२ नोव्हेंबर ते २८ फरवरी २०२६ पर्यंत चालणार आहे.आणी त्याविषयी जनजागृती प्रचार व प्रसार करण्यात येईल.तर जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमाला वंदना बरडे अधीसेवीका, सोनल भगत अप.,दिपिका गोटे,स्वेता गलफाडे,चंदन राठोड यांनी मेहनत घेतली व उपस्थित लाभार्थी यांना वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सोनल भगत अप.यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच न्युमोनियाचे व्यवस्थापन,त्याचे धोके,वायू प्रदूषण ,निमोनियाबद्दल तथ्य ईतर पोस्टर प्रदर्शनी लावून जनजागृती करण्यात आली तसेच दिवस व दिनांक, दिनविशेष दिवस मध्ये जागतिक दयाळू दिन, जागतिक गुणवत्ता दिन, जागतिक उपयोगिता दिन,निमोनिया दिन यांचे पोस्टर प्रदर्शनी लावून जनजागृती प्रचार व प्रसार करण्यात आला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here