prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गारवा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गारवा

0
107

हवामानात झाला बदल
वाढला हवेतील दमटपणा l
वर्षांऋतूनंतर वाढणारा गारवा
निमंत्रण देत आहे आजारपणा l

हवेत गारवा जाणवतो
जरी पावसाने घेतली माघार l
हिमवर्षाव हा हिवाळ्यातील
पर्जन्यवृष्टीचा एक प्रकार l

गोल बर्फाळ गोळ्याचा
हिमवर्षाव आकाशातून l
गोळे जमिनीवर पडतात
उबदार हवेच्या थरातून l

गारव्याचा परिणाम सर्दी
डोके नाक आणि घशावर l
ज्याने शिंका खोकला घसा
दुखणे परिणाम रक्तसंचयावर l

थंड कमी तापमानामुळे
होणारी शारीरिक भावना l
आजारपणाची आर्थिक
झळ बसत आहे रुग्णांना l

जरी असेल आरोचे पाणी
वारंवार हात धुत असाल l
प्रतिकार शक्ती कमी नको
कृपया त्याकडे लक्ष द्याल l

नियमित करावा व्यायाम
टाळावे शीतपेय पिणे l
नको उशिरापर्यंत जागरण
टाळावे फास्टफूड खाणे l

जगा आरोग्यदायी जीवनशैली
ताण तणावापासून राहा दूर l
आजारी पडू नये म्हणून ठेवा
ऋतू हवामानानुसार आहार विहार l

प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here